। नवी दिल्ली । दि.11 मार्च । पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. भाजपाला पाचपैकी चार राज्यांवर कब्जा करत दणदणीत विजय मिळवला आहे.
विशेषत: युपीमध्ये ज्या पद्धतीने पक्षाचा विजय झाला आहे, त्याची चर्चा अधिक आहे. तर अलीकडच्या काळात निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर प्रत्येक निवडणुकीनंतर भाजपविरोधात जोरदार भाषणबाजी करताना दिसत आहेत.
यावर बोलताना ते म्हणाले की, चार राज्यांमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील सत्तेची खरी लढाई 2024 मध्ये लढली जाईल, कोणत्याही राज्याच्या निवडणुकांद्वारे नाही असेही त्यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.
प्रशांत किशोर यांनी ट्विट करून लिहिले की, ‘देशाची लढाई 2024 मध्येच लढली जाईल आणि ठरवली जाईल, ती कोणत्याही राज्याच्या निवडणुकीच्या निकालांवर ते भविष्य ठरवली जाणार नाही. त्यामुळे चतुराईने विरोधकांवर मानसिक दबाव आणायचा हा प्रयत्न सुरू आहे.
त्यामुळे विजयाचा उन्माद करुन विरोधकांवर जो दबाव आणायचा प्रयत्न होत आहे या चतुराईला आणि होत असलेल्या अशा फसवणुकीला बळी पडू नका आणि त्याचा भागही बानू नका, असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे.