। अहमदनगर । दि.04 मार्च । जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज (4 मार्च) रोजी हिरवा झेंडा दाखविला.
यावेळी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर, उपस्थित होते. जिल्हकयातील तालुक्यां च्याम विविध भागात फिरणार्या या चित्ररथामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध 13 योजना डिजिटल बोर्डच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
या चित्ररथ मोहिमेचे अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालया मार्फत आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून करण्यात आली. हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा प्रचार-प्रसार करत फिरणार आहे.
यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी-परीक्षा फी, गटई कामगारांना पत्र्याचा स्टॉल, मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य,
निवाशी शाळा, वृध्द कलावंतांना मानधन,स्टॅड अप योजना,ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह, राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरण, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजना व अनुसूचित जाती उपयोजना या 13 योजनांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
Tags:
Ahmednagar