। अहमदनगर । दि.21 मार्च । राहुरी परिसरातील शेतकरी दत्तू गवराज गाडे (वय 60, रा. मोमीन आखाडा, राहुरी) हे भांड नावाच्या व्यक्तीला म्हणाले की, तुम्ही माझ्या विहिरीपासून तुमचा बोअर थोडा लांब घ्या, असे म्हटल्याचा राग येवून
चौघांनी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घरासमोर येवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने व लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना मोमीन आखाडा येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की दत्तू गाडे यांच्या विहिरीजवळच भांड हे बोअर घेत असताना दत्तू गाडे त्यांना म्हणाले की तुम्ही माझ्या विहिरीपासून जरा लांब बोअर घ्या असे म्हटले तर राग येऊन चौघांनी त्यांच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली.
मारहाणीत गाडे हे जखमी झाले. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी दत्तू गाडे यांच्या फिर्यादीवरुन मारहाण करणार्या विठ्ठल मनाजी भांड, महेंद्र विठ्ठल भांड, संदीप विठ्ठल भांड, शकुंतला विठ्ठल भांड (सर्व रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार हनुमंत आव्हाड पुढील तपास करीत आहेत.