१०६ वर्षांची गौरवशाली वाटचाल... अहमदनगर पोस्टल सोसायटीचा विश्वास कायम
पोस्टल कर्मचाऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडविणारी संस्था : आमदार संग्राम जगताप
। अहिल्यानगर । दि.23 जुन 2026 । अहमदनगर पोस्टल सोसायटीची १०६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन श्री. रामेश्वर ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथे उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी गुणवंत सभासद पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
क्लिक करुन वाचा साप्ताहिक विजयमार्ग...
कार्यक्रमात आमदार अक्षय कर्डीले यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार कर्डीले यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, "पोस्टल सोसायटीने केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था न राहता सभासदांच्या कल्याणाचा विचार करणारी संस्था म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. १०६ वर्षांची परंपरा ही संस्थेच्या पारदर्शक कारभाराची आणि सभासदांच्या विश्वासाची पावती आहे."
आमदार अक्षय कर्डीले म्हणाले, "अहिल्यानगर जिल्हा हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. सध्याच्या स्पर्धेच्या काळात सहकारी संस्था टिकविणे आव्हानात्मक असताना पोस्टल सोसायटीने १०६ वर्षे यशस्वी वाटचाल करणे ही अभिमानाची बाब आहे."
क्लिक करुन वाचा साप्ताहिक विजयमार्ग...
यावेळी अहिल्यानगरचे प्रवर अधीक्षक विकास पालवे यांनी पोस्टल विभागातील बदलत्या काळाची गरज आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "पोस्ट विभाग हा देशाच्या सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेला विश्वासाचा दुवा आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पोस्टल सोसायटी सातत्याने करत असलेले काम कौतुकास्पद आहे. आर्थिक शिस्त, सभासदांचा विश्वास आणि व्यवस्थापनाची पारदर्शकता यामुळे संस्था आजही सक्षमपणे उभी आहे."
सभेत संस्थेचे कार्यकारी संचालक प्रफुल्लकुमार काळे यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा सादर केला. कर्जवसुली नियमित होत असल्याने संस्थेची आर्थिक घडी मजबूत असून संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेने यावर्षीही ऑडिट ‘अ’ वर्ग कायम ठेवला असून सभासदांना कायम ठेवींवर ११ टक्के व्याज व शेअर्सवर ७ टक्के लाभांश देण्यात आला आहे.
यावेळी वरिष्ठ पोस्टमास्तर अमृत कुमटकर, ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज ग्रुप-सीचे जनरल सेक्रेटरी सुरेंद्र पालव, मुंबई सोसायटीचे मानद सचिव महेश सावंत, सहाय्यक डाक अधीक्षक बाळासाहेब बनकर,अमित देशमुख, पोस्टल सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुनील कुलकर्णी, निसार शेख, महेश तामटे, प्रमोद कदम, सलीम शेख, स्वप्ना चिलवर, अर्चना दहिंडे तसेच यावेळी संस्थेचे सभासद सतीश येवले, सचिन अस्वर, संदीप मिसाळ, सुखदेव पालवे, धनंजय दैठणकर, कविश्वर ताकपेरे, राजेंद्र राहिंज, सचिन गायकवाड, गणेश केसकर,
अजय आगळे महेश सदाफुले सुनील भागवत राजेंद्र कोल्हे नवनाथ शिंदे शैलेश राहींज राजेंद्र राहींज, अमोल बोरुडे, अंबादास सुद्रीक, बलराम दाते, सुनील चांडोले, कैलास भुजबळ, गोरक्ष आचार्य, जय मडावी, अर्जुन जटाळे, शंकर कडभणे, हर्ष कांबळे, आजीनाथ खेडकर, सुनील जाधव, सागर जाधव, शुभांगी मांडगे, ज्योती कांबळे, संचिता गा पदमराज पडलवार, संतोष झावरे, संचिता गाडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्लकुमार काळे यांनी केले तर प्रमोद कदम यांनी आभार मानले.
