आणखीन एका एसटी कर्मचार्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


। लातूर । दि.20 मार्च । अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचे विलिनीकरण मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. त्यामुळे या आंदोलनातील काही कर्मचार्‍यांवर महामंडळाने कारवाई केली आहे.अशाच निलंबन कारवाई करण्यात आलेल्या आणखीन एका एसटी कर्मचार्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात घडली आहे.

सतीश मधुकर चपटे (42)असे या मरण पावलेल्या एसटी कर्मचार्‍याचे नाव आहे. सतीश मधुकर चपटे यांच्यावर महामंडळाने दोन महिन्यांपूर्वी निलंबनाची कारवाई केली होती. महामंडळातील कर्मचार्‍यांनी मागील चार महिन्यापासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता.

त्यामध्ये ते पुढे असल्याने त्यांना 8 जानेवारी 2022 रोजी महामंडळाने निलंबित केले होते. निलंगा आगारात सतीश मधुकरराव चपटे हेकार्यरत  होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. हृदयविकाराच्या झटक्याने आणि आत्महत्येमुळे शंभर हून अधिक एसटी कामगारांनी आपला जीव गमावला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post