शिर्डीत २२ मार्चला होणार रंगपंचमी रथयात्रा मिरवणूक


। अहमदनगर । दि.20 मार्च । अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी  प्रतिबंधात्‍मक आदेशान्‍वये कायदा सुव्‍यवस्‍थेच्‍या कारणास्‍तव तातडीने साईबाबांची गुरुवारची पालखी व रंगपंचमी निमित्‍ताने निघणारी रथयात्रा मिरवणूक स्थगित केली होती. 

परंतु साईभक्‍तांची श्रध्‍दा, त्‍यांची मागणी आणि मंदिराची प्रथा परंपरा सुरु ठेवण्‍याच्‍या उद्देशाने संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी जिल्‍हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्‍याशी तातडीने संपर्क साधत रथयात्रा मिरवणूक सुरु करण्‍याची मागणी केली. 

त्‍यास मान्‍यता मिळाली असून, २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता रंगपंचमी निमित्‍ताने शिर्डी गावातून साई रथयात्रा मिरवणूक काढण्‍यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post