। अहमदनगर । दि.16 मार्च । मटका पेढीवर छाप्यांसाठी चक्क तीन वरिष्ठ अधिकार्यांचे पथक संगमनेरात दाखल झाल्याने या छाप्यांची संगमनेरात जोरदार चर्चा आहे. संगमनेर शहरातील तेलीखुंट, नेहरु चौक, कासट संकुल, कुरण रोड, केसेकर संकुलातील मटका पेढी, अकोले बायपास रस्त्यावरील मटका पेढ्यांवर छापे पडले.
स्थानिक पोलिस, अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाचे एक पथक आणि विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या नाशिकच्या पथकाने संगमनेरात घेऊन अचानक सात ठिकाणी कारवाई केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.
नाशिकवरून विशेष पथक संगमनेरमध्ये अवैध धंद्यांवर छापा टाकण्यासाठी निघाल्याची खबर स्थानिक पोलिसांना कळताच, स्थानिक पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी छापे टाकले तर हीच खबर अपर पोलिस अधीक्षक कार्यालयाला कळताच त्यांनीही तातडीने संगमनेरमध्ये धाव घेऊन
एका ठिकाणी छापा टाकून कारवाई केली तर विशेष पथकाने जुगार क्लबवर छापा टाकून आपली कामगिरी नोंदवली आहे. त्यामुळे हा एक चर्चेचा विषय झाला असून एका दिवशी एवढ्या मोठ्या तीन टीमने संगमनेरात छोटे-छोटे छापे टाकून कारवाई केली त्याबद्दल सामान्य नागरिकांनी मात्र स्वागत केले आहे.
खालील बातम्या देखील वाचा...
मुख्याध्यापक संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी...