। अहमदनगर । दि.15 एप्रिल । कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारात काही इसम संशयास्पदरीत्या फिरत होते. यावरून कर्जत पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि जवान यांनी तत्काळ त्या ठिकाणी पोहोचून संशयित इसमांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पळून जाऊ लागल्याने त्यांचा पाठलाग सुरू झाला.
त्यापैकी शाहूराज बाबासाहेब कोकरे (रा.कर्जत) याला पल्सर गाडीसह ताब्यात घेण्यात आले. शहादेव उर्फ शहाजी गोकुळ शिरगिरे (रा. जामवाडी ता. जामखेड) व अक्षय प्रभाकर डाडर (रा. पाटेगाव ता. कर्जत) हे फरार झाले होते.
त्यांच्यावर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी एका वाहनाला अडवून चालकाला लुटण्याचा उद्देशाने मारहाण केली होती.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलिस जवान वैभव सुपेकर, महादेव कोहक, श्याम जाधव, सुनील खैरे यांनी ही कारवाई केली.