जलवाहिनी लिकेज झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत


 । अहमदनगर । दि.16 मार्च । मंगळवार 15 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजलेच्या सुमारास नगर शहरास पाणीपुरवठा करणारी नवीन मुख्य 1100 एम.एम. (झडउ) जलवाहिनी बाभळगाव शिवारात पवार वस्तीजवळ पाण्याच्या व हवेच्या दाबाने मोठ्या प्रमाणात लिकेज झालेली आहे. त्यासाठी सदरहू जलवाहिनीद्वारे मुळानगर येथून होणारा पाणी उपसा बंद करुन जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेवून युध्द पातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. 

परंतु तांत्रिक अडचणीमुळे दुरुस्ती कामास अवधी लागणार आहे. तदनुसार सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यानच्या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. 

त्यामुळे मंगळवार 15 मार्च रोजी पाणी वाटप सुरु असलेल्या सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, विनायकनगर, आगरकर मळा, कायनेटीक चौक परिसर, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास सकाळी 11.00 नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणीपुरवठा होउ शकणार नाही. सदरचा पाणीपुरवठा हा 16 मार्च रोजी करणेत येईल.

तसेच 16 मार्च रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्तगल्ली, माळीवाडा (काही भाग), माणिक चौक, आनंदी बाजार, जुने मनपा कार्यालय परिसर, पंचपीर चावडी, बालिकाश्रम रोड परिसर इत्यादी भागास पाणीपुरवठा होणार नसून या भागातील पाणीपुरवठा हा बुधवार ऐवजी गुरुवार 17 मार्च रोजी करण्यात येईल.

त्याचप्रमाणे गुरुवार 17 मार्च रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्र खुंट, कोठला, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको, सावेडी, सारसनगर व बुरुडगावरोड 

या भागातील पाणीपुरवठा हा गुरुवार ऐवजी शुक्रवार 18 मार्च रोजी करण्यात येईल. नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर सौ. रोहिणी शेंडगे व आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

हे देखील वाचा......दारूच्या नशेत केला पत्नीचा खून ; गुन्हा दाखल 

हे देखील वाचा...अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना

हे देखील वाचा...संगमनेरला तीन ठिकाणच्या अवैध धंद्यावर पोलिसांचे छापे 

Post a Comment

Previous Post Next Post