आज 19 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 24 बाधितांची रुग्णसंख्येत भर

आज 19 रूग्णांना डिस्चार्ज तर 

नव्या 24 बाधितांची रुग्णसंख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.12 टक्के 

। अहमदनगर । दि.15 मार्च । जिल्ह्यात आज 19 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 87 हजार 42 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 98.12 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 24 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 179 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 09 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 12 आणि अँटीजेन चाचणीत 03 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  मनपा 03, संगमनेर 02, श्रीरामपूर 03 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये जामखेड 01, नेवासा 02, पाथर्डी 03, राहता 02, राहुरी 01, आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 03 जण बाधित आढळुन आले. यात नेवासा 01, राहता 01 आणि संगमनेर 01 अशा रुग्णांचा  समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 08, अकोले 01, नगर ग्रा.01, नेवासा 03, पाथर्डी 01, राहुरी 01, संगमनेर 01 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या : 3,87,042

*उपचार सुरू असलेले रूग्ण : 179

*पोर्टलवरील मृत्यू नोंद : 7224

*एकूण रूग्ण संख्या : 3,94,445


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर) 

दिनांक 15 मार्च, 2022

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

Post a Comment

Previous Post Next Post