महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी सेनेची पोलिस अधीक्षकांशी चर्चा


। अहमदनगर । दि.16 मार्च । शिवसेनेच्यावतीने नगर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली.

यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, सभागृहनेते अशोक बडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड, गौरव ढोणे आदी उपस्थित होते.

यावेळी संभाजी कदम म्हणाले, महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणे, प्रोफेसर कॉलनी चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविणे, माळीवाडा येथील महात्मा फुले व मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृत पुतळा बसविण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक हे या समितीचे सदस्य असल्याने त्यांनी संबंधित ठिकाणी पुतळा बसविण्याबाबत ज्या-ज्या शासकीय परवानगीची गरज आहे, त्यासाठीच्या आवश्यक बाबींची पूर्तता कशी करता येईल, हे पुतळे बसविण्याबाबत कोणत्या अडचणी आहेत, यासंदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षकांशी चर्चा केली आहे, त्यांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे कदम यांनी सांगितले.

यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची सर्वांचे म्हणणे ऐकून घेत याबाबत आपण पोलिस उपअधीक्षक व मनपा अधिकारी यांच्यासह संबंधित पुतळा बसविण्यात येणार्‍या जागेची पाहणी करुन तेथील सुरक्षितता, त्याचबरोबर शासकीय परवानगी आदी बाबींचा विचार करून अधिकार्‍यांचा अहवाल प्राप्त करुन जिल्हाधिकार्‍ंयाकडे सोपवली जाईल, त्यानंतर याबाबत निर्णय होईल, असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post