शहरात पत्रामार्केटवर जेसीबी !


। अहमदनगर । दि.16 मार्च । नगर शहरामध्ये पंधराशेहून अधिक ठिकाणी अनधिकृतपणे पत्र्यांचे गाळे उभारण्यात आले आहे. पत्रामार्केट म्हणून ते ओळखले जात आहे. हे गाळे हटविण्याचे मोहिम महानगरपालिकेने मंगळवारपासून सुरू केली आहे.

सावेडी उपनगरातील पाइपलाइनरोडवरील यशोदानगर येथील असाच एका गाळ्यावर महानगरपालिकेने कारवाई केली. सुमारे 25 गाळे जेसीबीने तोडण्यात आले आहेत. शहर, सावेडी, केडगाव उपनगर कल्याण रोड या भागांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून पत्र्यांचे शेड उभारून गाळे तयार करण्यात आलेले आहे.

त्यासाठी महानगरपालिकेकडून परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे गाळे अनधिकृत आहेत. खासगी मालकांनी पत्र्यांचे गाळे उभारून हे गाळे भाडेतत्वावर दिले आहेत. या पत्रामार्केटमुळे मनपाचे उत्पन्न बुडाले आहेत.

मनपा प्रशासनाकडून पत्रमार्केटवर कारवाई करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. मनपाने केलेल्या सर्वेक्षणात शहरामध्ये पंधराहून अधिक अशा पध्दतीचे गाळे उभारण्यात आल्याचे उघडीकस आले आहे. त्यानंतर शहरात या पध्दतीने पत्रे लावून शेड उभारून गाळे तयार करण्यात येतच आहे.

त्यामुळे मनपाने गाळे मालकांना नोटीसा देऊन सुनावणी घेतली. आता मनपाने अशा गाळेधारकांवर थेट कारवाई सुरू केली आहे. पाइपलाइन रोडवरील यशोदानगर भागातील पत्र्यांचे गाळे हटविण्यास मनपाने मंगळवारपासून सुरुवात केली आहे. आज दिवसभरात या ठिकाणचे 25 गाळे हटविण्यात आलेले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post