। अहमदनगर । दि.23 मार्च । संत तुकडोजी महाराजांच्या, संत गाडगेबाबांच्या भूमीतील वाशिम जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषवाडी, सारोळा कासार (ता.नगर) येथील शिक्षिका कु.सीमा गावडे यांना जिजाऊ ब्रिगेड व विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त माऊली सभागृह अहमदनगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद अहमदनगर चे माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी राहुरी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय संघटक अनिताताई काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल प्रा. गावडे यांचे पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी श्री.रत्नपारखी, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ भास्कर इदगे, कला आणि सांस्कृतिक विभाग भारत सरकार चे डायरेक्टर डॉ. ऋषी वशिष्ठ यांनी अभिनंदन केले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
या बातम्या देखील वाचा....
लाचेची मागणी केल्या प्रकरणी पोलिसावर गुन्हा....
खरीप हंगामापूर्वीच खतं खरेदी करा...
