। नवीदिल्ली । दि.22 मार्च । निवडणुकीच्या हंगामात पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. परंतु निवडणुकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर काही दिवसातच आता निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोलच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे.
आता घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीमध्ये तब्बल 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आजपासून (मंगळवार) 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे.
काही महिन्यांच्या कालावधीनंतर एलपीजी सिलिंडरचे दर वाढण्यात आले आहेत. 6 ऑक्टोबर 2021 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर शेवटच्या वेळी बदलण्यात आले होते. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 949.5 रुपये झालीय.
निवडणुकीच्या हंगामात पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. मात्र, आता निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोलच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे. घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीमध्ये तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Tags:
Breaking
