रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा


। पुणे । दि.23 मार्च । रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडले आहे.

त्यांनी आज आपल्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची नियुक्ती होते हे पहावं लागणार आहे.रुपाली चाकणकर यांनी एक व्यक्ती एक पद यानुसार राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे.

यावेळी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, 27 जुलै 2019 रोजी मला राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार मिळाला. जुलै महिन्यात पदभार स्वीकारला आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात सर्वत्र पूर स्थिती होती.

त्याच काळात अनेक लोक आपल्या पक्षाला सोडून जात होते. पहिल्या आढावा बैठकीत पूरस्थिती होती अशा वेळी महिला आपल्या बैठकीत कशा येणार असा प्रश्न होता. पण आपल्या कार्याचा अनुभव असल्याने मी आढावा बैठक घेतली.

रुपाली चाकणकर यांना या संधीच सोनं केल. रुपाली चाकणकर यांनी आपल्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आता या पदावर कुणाची नियुक्ती करण्यात येणार? या पदावर कोणाला संधी राष्ट्रवादी देणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post