। कोल्हापूर । दि.02 मार्च । स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आणखीनच आक्रमक झाली आहे. गेल्या 9 दिवसांपासून कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
मात्र, सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शुक्रवारी 4 मार्चला राज्यभर चक्काजाम आंदोलनाची घोषणाकरण्यात आली आहे. स्वतः राजू शेट्टी यांनी याबाबत माहिती दिली.
'या' मागन्यांसाठी सुरू आहे धरणे आंदोलन - शेतीला दिवसा 10 तास विनाकपात वीज द्या, शेतीपंपाच्या वीज बिलांची तत्काळ दुरूस्ती करावी, शेतीपंपाची कनेक्शन तोडणे त्वरीत थांबवावे, अन्यायी वीज बील वसुली थांबवावी आदी मागण्यासाठी
गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. 22 फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शेट्टी आता आक्रमक झाले आहेत.