अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
। अहमदनगर । दि.21 मार्च । श्रीरामपूर शहरात पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या पथकाने जुगार खेळवणार्या क्लबवर छापा टाकून दोन लाख त्रेचाळीस हजार 780 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. यात 20 जणांना ताब्यात घेण्यात आले. तर एक जण पसार आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरात जुगार, मटका तसेच अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शहरात अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच पोलिस उपविभागीय कार्यालय असतानाही शहर पोलिस ठाण्याचे दुर्लक्ष असल्याचे यावरून स्पष्ट होते. पोलिस उपमहानिरीक्षक पथकाने दोन-तीन ठिकाणी छापे टाकले.
यात तिरट नावाचा पत्त्याचा जुगार पैसे लावून खेळत असताना काहीजणांना पकडले. यात दिनेश मोहनदास माखिजा, चंद्रकांत गोपीनाथ गुडधे, नसीम मुख्तार शेख, अमरजितसिंग, जावेद खलिद मलिक, रोहिदास अडागळे, सुखदेव गांगुडे, जाफर करीम शेख, जुनेद असलम मेमन, सलमान हसन कुरेशी, समीर शेळके, जैनुद्दीन याकूब शेख, तुषार नाणेकर, राजेश गोसावी, अजमल नासिर शेख,
सर्फराज बाबा शेख, अकील शेख, अमजद पठाण यासह अन्य 21 जण तिरट नावाचा जुगार खेळत असताना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून 45 हजार 780 रुपये रोख रक्कम, 63 हजारांचे 15 मोबाईल, 1 लाख 55 हजारांच्या पाच मोटारसायकल असा एकूण 2 लाख 43 हजार 780 रुपयांचा
ऐवज हस्तगत केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात पोलिस नाईक सुरेश मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मुंबई जुगार क्ट 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई श्रीरामपूर शहर पोलिस करीत आहे.