आज 143 रूग्णांना डिस्चार्ज तर
नव्या 51 बाधितांची रुग्णसंख्येत भर
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.05 टक्के
। अहमदनगर । दि.03 मार्च । जिल्ह्यात आज 143 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 86 हजार 409 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 98.05 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 51 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 472 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 10 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 28 आणि अँटीजेन चाचणीत 13 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 08, संगमनेर 01 आणि श्रीरामपूर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 04, अकोले 01, कोपरगाव 10, नेवासा 02, पारनेर 01, राहता 08, संगमनेर 01 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 13 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 01, अकोले 11 आणि श्रीरामपूर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 12, अकोले 03, जामखेड 01, कर्जत 02, कोपरगाव 61, नगर ग्रा. 04, नेवासा 02, पारनेर 13, राहाता 29, राहुरी 01, संगमनेर 03, शेवगांव 02, श्रीरामपूर 04, कॅंटोन्मेंट बोर्ड 01, मिलिटरी हॉस्पिटल 01 आणि इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या : 3,86,409
*उपचार सुरू असलेले रूग्ण : 472
*पोर्टलवरील मृत्यू नोंद : 7222
*एकूण रूग्ण संख्या : 3,94,103
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
दिनांक 03 मार्च, 2022
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
Tags:
Ahmednagar
Play Free Casino Games Online - MapYRO
ReplyDeleteFree Casino 부천 출장샵 Games Online in 안양 출장샵 the Netherlands | Play Free 정읍 출장마사지 Casino Games For 의왕 출장마사지 Fun & Win Real 서산 출장안마 Money. Check the BEST & NEW CASINO GAMES online!