राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; लाखोंचा विदेशी मद्याचा बनावट साठा जप्त


। अहमदनगर । दि.03 मार्च । महाराष्ट्रात राज्यात प्रतिबंधीत असलेला गोवा राज्यातील 11 लाख 21 हजार 730 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा व बनावट लेबल्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर कार्यालयातर्फे आज जप्त करण्यात आला.

कारवाईमध्ये दामू पुंजाराम जाधव अंदाजे (वय 42 वर्ष) आणि रामू पुंजाराम जाधव अंदाजे (वय 45) राहणार भैरवनाथ मंदिरा जवळ, घोडेगाव परिसर, अहमदनगर येथून सदरहू साठा जप्त करण्यात आला.  

परराज्यातील विदेशी मद्यसाठा बेकायदेशीरपणे साठवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा,1949 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या कार्यालयाच्या वतीने पुढील तपास सुरू आहे, असे अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.    

Post a Comment

Previous Post Next Post