मातोश्री मंडुबाई कळमकर यांचे निधन
। नगर । दि.10 एप्रिल । ज्येष्ठ नेते माजी आ.दादाभाऊ कळमकर यांच्या मातोश्री मंडूबाई दशरथ कळमकर यांचे शुक्रवारी (दि.10) रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्या 95 वर्षांच्या होत्या.
पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक या दुष्काळी गावातून मंदाबाई यांनी 1972 साली पती, दोन मुले, दोन मुलींना घेऊन रोजगारासाठी नगर गाठले,
नगर येथे 1972 च्या दुष्काळात कुटुंबाला सावरत त्यांनी झोपडी कँन्टीन नावाने हॉटेल सुरु करुन कुटुंबाचे पोलन पोषण केले. अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी परिवाराचा सांभाळ करीत मुलांना मोठं केले.
त्यांच्यापश्चात 2 मुले, विवाहित मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
माजी आमदार दादाभाऊ कळमकर व उद्योजक बाळासाहेब कळमकर यांच्या त्या मातोश्री होत. माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या त्या आजी होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
