। अहमदनगर । दि.21 फेब्रुवारी । कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणार्या फरार आरोपीस तोफखाना पोलिसांनी अटक केली. नगर शहरात अनेकांना फसवून व कोटयवधीचा घोटाळा करुन फरार असणार्या सोमनाथ एकनाथ राऊत (वय 42 रा. पाथरवाला ता. नेवासा जि. अहमदनगर) या आरोपीस तोफखाना पोलिसांनी अखेर पकडले.
अहमदनगर जिल्हयात फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची शोध मोहीम चालू आहे. या मोहिमेअंर्तगत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार तोफखाना तपास पथकामधील पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलिस हवालदार दत्तात्रय जपे, पोलिस नाईक अविनाश वाकचौरे, पोलिस नाईक सूरज वाबळे व शैलेश गोमसाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल गुन्हयात बिग मी इंडिया कंपनीच्या माध्यमातून जनतेस कोटयवधीचा चुना लावून फरार असलेला आरोपी सोमनाथ एकनाथ राऊत यास तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले व गुन्हयाच्या पुढील तपास कामी आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांच्या ताब्यात दिले आहे.
Tags:
Ahmednagar