। पुणे । दि.16 फेब्रुवारी । मराठा जोडो अभियानाच्या माध्यमातून उस तोड कामगारांना थंडी पासून संरक्षणासाठी उबदार चादरी वाटप करण्यात आल्या असल्याची माहिती अध्यक्ष उध्दव शिवले यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना शिवले म्हणाले की, मराठा जोडो अभियानाच्या माध्यमातून वेळोवळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. बहुजन समाजातील अनेक नागरीक विविध गोष्टीपासून वंचित असून त्यांना मदत करण्यासाठी मराठा जोडा अभियान काम करत आहे.
यावेळी मराठा जोडो अभियानाचे अध्यक्ष उध्दव शिवले, प्रदेशाध्यक्ष नितीन जाधव, महासचिव अविनाश करंजे, प्रदेश संघटक गजानन वाघमोडे, अजित करंजे, समीर भूजबळ आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.