। उस्मानाबाद । दि.26 फेब्रुवारी । गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा’, या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन सुरु आहे. यावर ठोस असा तोडगा निघत नसल्याने आता कर्मचारी टोकाची भुमीका घेताना दिसत आहे.
एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला आता तीन महिने होत आल आहेत. मात्र, अद्याप तरी यावर तोडगा निघालेला नाही. यातुन कर्मचार्यांपुढे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने कर्मचारी मागणीवर निर्णय होईपर्यंत संप कायम ठेवण्याची भूमिका संपकरी कर्मचार्यांनी घेतली आहे.
या तीन महिन्यांच्या काळात अनेक एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आज उस्मानाबादमध्ये आणखी एका एसटी कर्मचार्याने आपलं जीवन संपवलं. हनुमंत चंद्रकात आकोसकर असं आत्महत्या केलेल्या कर्मचार्याचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. आई-वडिल, पत्नी आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे. हनुमंत यांच्या आत्महत्यने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Tags:
Breaking