चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले


। अहमदनगर । दि.26 फेब्रुवारी । जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात फक्राबाद शिवारात राहणारे पोपळे यांच्या घरात रात्री 10 च्यासुमारास दोन चोरटे घुसले त्यांनी हातातील लोखंडी वस्तूने मारण्याची धमकी देवून व जर आरडाओरड केली तर मारुन टाकू असे धमकावले आणि महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले.

तसेच राहीबाई या वृद्ध महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने ओढून तोडून घेतले. त्यामुळे त्यांच्या कानाला जखम झाली. तसेच डब्यात ठेवलेली रोख रक्कम चोरली. असा पाऊण लाखाचा ऐवज लुटून नेला. याबाबत विठ्ठल किसन पोपळे (रा. फक्राबाद शिवार) यांच्या फिर्यादीवरुन जामखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post