। अहमदनगर । दि.24 जानेवारी । अहमदनगर शहरातील तपोवन रोड परिसरात एका भाजीपाला विक्रेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला घरात घुसून शिवीगाळ तसेच मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात पांडुरंग मारुती काळे( रा. श्रेयशनगर, तपोवन रोड, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहाजणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक गिते, सोमनाथ गिते व चार अनोळखी व्यक्ती यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तर तो वर्ग बंद ठेवणार; राजेश टोपे यांची माहिती
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी अशोक गिते याला फिर्यादी हे, तू माझ्या घराकडे का पाहतो असे विचारण्यासाठी गेले असता अशोक याने फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर काही वेळाने अशोक गिते, सोमनाथ गिते व इतर चौघांनी काळे यांच्या घरात घुसून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी
याचदरम्यान भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या काळे यांच्या दोन्ही मुलींना चौघे शिवीगाळ करुन म्हणाले, तू जर आमच्या नादी लागला तर तुला व तुझ्या मुलींना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी तोफखाना गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलिस हवालदार सुधीर क्षीरसागर करीत आहे.
Tags:
Breaking