पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला चांगला भाव


। अहमदनगर । दि.27 जानेवारी । बुधवारी पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. कांद्याची सुमारे 32 हजार 810 कांदा गोण्यांची आवक झाली आहे.  कांद्याला 2500 ते 3000 रुपयांचा भाव ठरावीक वक्कलाच मिळाला.

पारनेर बाजार समितीत बुधवारी कांद्याच्या 32 हजार 810 कांदा गोण्यांची आवक झाली तर एक नंबर कांद्याला 2400 रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे.

गावरान कांद्याचे प्रतवारीनुसार बाजार भाव : एक नंबर कांदा : 1900 ते 2400, दोन नंबर कांदा : 1000  ते  1800 तीन नंबर कांदा : 600  ते 900, चार नंबर कांदा : 200 ते 500.

शेतकर्‍यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्री आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post