। अहमदनगर । दि.20 जानेवारी । पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव बुधवारी झाले. सुमारे 37 हजार 817 कांदा गोण्या आवक झालेली आहे. कांद्याला 2500 ते 3025 सात ते आठ वक्कलला भाव मिळाला.
पारनेर बाजार समितीत 37 हजार 817 कांदा गाेण्यांची आवक झाली हाेती. यामध्ये एक नंबर लाल कांद्याला 2400 रुपयांचा भाव मिळाला.
गावरान कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः 1900 ते 1900, दाेन नंबर कांद्याला ः 1000 ते 1800, तीन नंबर कांद्याला ः 600 ते 900 व चार नंबर कांद्याला 200 ते 500 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला.
शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन पारनेर बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
Tags:
Ahmednagar