घरावरील स्पीकरची तोडफोड करणारे जेरबंद


। अहमदनगर । दि.18 जानेवारी । मकर संक्रांतीनिमित्त सुरू असलेल्या पतंगोत्सव दरम्यान स्पीकरची मोडतोड करून मारहाण करण्याची घटना भिंगारमधील आलमगिरी भागात घडली होती. याप्रकरणी भिंगार पोलिसांनी आरोपी शोयब अन्सार मोमीन (वय २४) व सोहेल अन्सार मोमीन (वय २२, दोन्ही रा. आलमगीर) यांना अटक केली.

अखिल भारतीय छावा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी सचिव पदी दत्ता वामन 

आलमगीरमधील द्वारकाधीश कॉलनी भागात १४ जानेवारीला सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी एक महिलेने भिंगार पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट दिली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलिस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांना आरोपी पकडण्यासाठी तत्काळ सूचना दिल्या होत्या. 

श्री कोरठण खंडोबा यात्रेची महापूजा संपन्न 

भिंगार पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध रात्री एक वाजता अटक केली. दरम्यान, या घटनेबाबत सोशल मीडियावर अफवा पसरविल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार आहे, असा इशारा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिला आहे.

अवैधरित्या अन्नधान्य साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई 


Post a Comment

Previous Post Next Post