। अहमदनगर । दि.23 जानेवारी । जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील गंगाबाबा पेट्रोल पंपावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत मोठी रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून त्यांच्याकडून तपास चालू आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगाबाबा पेट्रोल पंपावरील कर्मचारी रात्री पंप बंद करून आणि जमा झालेली रक्कम पेट्रोल पंपाच्या ऑफिसमधील ड्रॉवरमध्ये ठेवून झोपी गेले. त्यानंतर ऑफिसची खिडकी अज्ञात चोरट्यांनी तोडून ऑफिसमध्ये
प्रवेश करून ड्रॉवर तोडला आणि त्यातील रोख रक्कम चोरून नेली. ही रक्कम चार लाख सत्तर हजार इतकी आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पुढील तपास सुरू केला, अशी माहिती पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास चौहान यांनी दिली आहे.