श्रीरामपूरचे दोघे पोलीस ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात !


। अहमदनगर । दि.28 जानेवारी । घराची भिंत बांधण्यावरून सुरू असलेल्या दोघा भावातील वादात तक्रारदारास साहाय्य करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना दोघे पोलीस कर्मचारी रंगेहाथ सापळ्यात अडकले आहेत.

पोलीस हवालदार सुनील उत्तमराव वाघचौरे व पोलीस शिपाई गणेश हरी ठोकळ अशी लाच घेणार्‍या दोघा पोलिसांची नावे आहेत.

नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती साधना इंगळे, पोलीस हवालदार सचिन गोसावी, पोलीस हवालदार प्रफुल माळी, पोलीस नाईक गीते, पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

तक्रारदार व त्यांच्या भावामध्ये घराची भिंत बांधण्यावरून आपसात वाद होते. या ठिकाणी तक्रारदार यांना काम करण्यास तसेच तक्रारदार व त्यांच्या भावात असलेल्या वादाच्यावेळी त्यांना सहकार्य करण्याचे मोबदल्यात 15 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.

तडजोडी अंति 10 हजार रुपये ठरले होते. ही लाच स्वीकारताना दोघे पोलीस कर्मचारी रंगेहाथ लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post