एसटीच्या बॅटरीसह साहित्याची चोरी


। अहमदनगर । दि.19 जानेवारी । एसटी बसची बॅटरी व साहित्याची चोरी करण्यात आल्याची घटना सारोळा बद्दी गावात (ता. नगर) दि.6 रोजी घडली. सुमारे 6 हजार 300 रूपयांच्या साहित्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात संजय गणपत आल्हाडे (वय 47, रा. वरप, कल्याण, जि. ठाणे) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोरीवली ते अंबेजोगाई ही एसटी बस (एमएच 09 एफएल 0336) सारोळाबद्दी गावाच्या एसटी स्थानकाजवळील हनुमान मंदिराजवळील परिसरात उभी असताना, अज्ञात चोरट्याने बसची बॅटरी व साहित्याची चोरी केली. या घटनेचा पुढील तपास पोना वणवे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post