ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

 


। अहमदनगर । दि.27 जानेवारी ।  नगर-पुणे रोडने भरधाव वेगात जाणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉली चालकाने कुठल्याही प्रकारचे इंडिकेटर न लावता व सिग्नल न देता बेफिकिरीने वेगात ट्रॅक्टर (क्रमांक एमएच 23 एएस 5750) व त्याला जोडलेली ट्रॉली (क्रमांक एमएच 23 क्यू 5932) 

चालवल्याने पाठीमागून येणार्‍या मोटारसायकल (क्रमांक एमएच 16 बीई 0850) ट्रॉलीवर आदळल्याने मोटारसायकलस्वार प्रवीण लक्ष्मण गुंजाळ (वय 38, राहणार कामरगाव, नगर--पुणे रोड, अ.नगर) याचा मृत्यू झाला. ही घटना नगर-पुणे रोडवरील इंडियन पेट्रोल पंपाजवळ कामरगाव शिवारात घडली. 

याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी संदीप रामचंद्र गुंजाळ (वय 40, राहणार कामरगाव, तालुका नगर) यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक राजेंद्र बाबासाहेब कर्डिले (राहणार कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड) याच्याविरुद्ध अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार जंबे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post