पाच हजाराची लाच स्विकारताना ‘त्या’ शैक्षणिक संस्थेचा लिपिक जाळ्यात


। अहमदनगर । दि.23 नोव्हेंबर । नगरमधील एका शैक्षणिक  संस्थेतील लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. ही घटना दि.22 रोजी तपोवन रोडवरील शिवरत्न चहाचे हॉटेल समोर घडली.

यामध्ये असद युसुफ खान पठाण (वय 42 वर्ष,  धंदा- नौकरी, कनिष्ठ लिपिक, वर्ग-3, एकता कॉलेज ऑफ सायन्स ऍंड कॉमर्स, अहमदनगर) राहणार युसुफ इनामदार यांचे घरात भाड्याने, दरबार चौक, मुकुंदनगर, अहमदनगर असे लाच स्विकारणार्‍याचे नांव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार हे एकता कॉलेज ऑफ सायन्स ऍंड कॉमर्स, अहमदनगर येथे सायन्स द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते. त्यांना बी एस सी तृतीय वर्ष रसायनशास्त्र या विषयाकरिता प्रवेश घेण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक हे प्रवेश फी व्यतिरिक्त 5000/- मागत असले बाबत ची तक्रार तक्रारदार यांनी ला. प्र. विभागाकडे दिनांक 22 नारेव्हेंबर 2021 रोजी केली.

त्यावरून एकता कॉलेज येथे लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक याने पंचा समक्ष तक्रारदार यांचे कडे 5000/- ची मागणी केली. त्यानंतर तपोवन रोड वरील शिवरत्न चहाचे हॉटेल समोर आयोजित सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम आरोपी लोकसेवक याने पंचासमक्ष स्विकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

ही कारवाई नाशिकचे पोलिस अधीक्षक ला.प्र.विभागाचे सुनील कडासने, वाचक पोलीस उपअधीक्षक नाशिकचे सतिष भामरे, उच्च शिक्षण  विभागाचे मा.संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे यांच्यासह

पोलिस उपअधीक्षक हरीष खेडकर, यांच्यासह पथकातील पोलिस हवालदार संतोष शिंदे, पोलिस ना.रमेश चौधरी, बाबासाहेब कराड, महिला पोलीस अंमलदार संध्या म्हस्के, चालक हवालदार हारुन शेख, पोलिस नाईक राहुल डोळसे  आदींनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post