बायोडिझेल प्रकरणातील आरोपीची तब्येत खालावली


। अहमदनगर । दि.23 नोव्हेंबर । नगर शहरामध्ये बायोडिझेल प्रकरणामध्ये अटक करण्यात आरोपीची तब्येत बिघडल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयातून पुणे येथे उपचारासाठी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

हे देखील वाचा......कोराना बाधितांची संख्या शंभराच्या आतमध्ये

कैलास गंगाधर करांडे (वय 52, रा. केडगाव, अहमदनगर) यांना बायोडिझेल प्रकरणामध्ये मागील आठवड्यामध्ये अटक करण्यात आली होती. दोन दिवसापासून त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. 

हे देखील वाचा...जिल्ह्यात 22 ते 28 नोव्हेंबर दरम्यान 144 कलम लागू 

नगर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांची अचानकपणे पुन्हा तब्येत खालावली. त्यांना रक्तदाबाचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला, त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ पुणे येथे उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार करांडे यांना पुणे येथे हलवण्याचा निर्णय झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

हे देखील वाचा...धुम स्टाईलने गळ्यातील गंठण लांबविले 

Post a Comment

Previous Post Next Post