टेम्पोच्या धडकेत तरुणी गंभीर जखमी


। अहमदनगर । दि.25 नोव्हेंबर । भरधाव वेगात जाणार्‍या छोटा हत्ती टेम्पो (क्रमांक एमएच सोळा सीडी 1124) चालाकाने समोरून येणार्‍या दुचाकीस धडक दिली. या धडकेत 21 वर्षीय ऋतुजा चंद्रकात लगड (राहणार कोळगाव, तालुका श्रीगोंदा) ही गंभीर जखमी झाली.

 ही घटना कोळगाव शिवारातील ढोरजा रोडवरील विठ्ठल दळवी यांच्या शेतासमोर घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलिसांनी टेम्पो चालक ज्ञानेश्वर बाळासाहेब कोल्हे (राहणार बेलवंडी कोठार) याच्या विरुध्द अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार मोरे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post