प्रा.अरविंद शिंदे यांची राष्ट्रवादी अर्बन सेलच्या शहर अध्यक्षपदी नियुक्ती
। अहमदनगर । दि.23 नोव्हेंबर । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रामध्ये अर्बन सेलची स्थापना करून राज्याच्या अध्यक्षपदी खा.वंदना चव्हाण यांची निवड झाली आहे. त्यांनी राष्ट्रवादी नगर अर्बन सेलच्या शहराध्यक्षपदी प्रा.अरविंद शिंदे यांची निवड केली आहे.प्रा.शिंदे हे विद्यार्थी चळवळीपासून शहरांमध्ये काम करत आहेत
त्यांच्या अनुभवाचा उपयोग राष्ट्रवादी पक्षाला नक्कीच होईल व नगर शहरामध्ये अर्बन सेल चांगल्या पद्धतीचे काम करून राष्ट्रवादीचे मोठे संघटन निर्माण करेल,अरविंद शिंदे यांनी माझ्याबरोबर प्रामाणिकपणे पक्षा निष्ठेने काम केले आहे. आता पक्षाने टाकलेली जबाबदारी सक्षम पणे पार पाडतील असे प्रतिपादन अरुणकाका जगताप यांनी व्यक्त केले.
प्रा.अरविंद शिंदे यांना राष्ट्रवादी अर्बन सेलच्या शहर अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देतांना आ.अरुणकाका जगताप समवेत आमदार संग्राम जगताप,उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते,महिला शहराध्यक्ष रेश्मा आठरे, मा.नगरसेवक दगडूमामा पवार,
मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर,युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे,आरिफ शेख,वैभव ढाकणे,संतोष लांडगे,संभाजी पवार,वैभव वाघ,माउली जाधव,संतोष ढाकणे,सागर गुंजाळ, सोनू घेमुड,बापूराजे भोसले,जॉय लोखंडे,सुरेश सुंबे तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.अरविंद शिंदे म्हणाले की,पक्षाने व आ.अरुणकाका जगताप तसेच आ.संग्राम जगताप यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे त्यास मी पात्र राहून काम करणार.आमदार संग्राम जगताप यांचे काम नागरिकांपर्यंत घेऊन जाणार, समाजामधील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे ते म्हणाले.