राहत्यामध्ये कांद्याला काय मिळाला भाव....वाचा सविस्तर

। अहमदनगर । दि.29 सप्टेंबर ।  तालुक्यातील राहाता बाजार समितीत कांद्याच्या सुमारे तीन हजार कांदा गोण्यांची आज (बुधवारी) आवक झाली आहे. कांद्याला आज 2200 शे रुपयांचा भाव मिळाला आहे.

राहाता बाजार समितीत कांद्याच्या दोन हजार 992 कांदा गोण्यांची आवक झाली आहे. तर एक नंबर कांद्याला आज  2200 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला आहे.

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव खालीलप्रमाणे
एक नंबर कांदा : 1900 ते 2200
दोन नंबर कांदा : 1350 ते 1850
तीन नंबर कांदा : 600 ते 1200,
गोल्टी कांदा : 1400 ते 1700
जोड कांदा : 100 ते 700.

शेतकर्‍यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या संचालक मंडळासह सचिवांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post