श्रीरामपुरात चौघांना दहा दुचाकी व एका टेम्पोसह पोलिसांनी पकडले

। अहमदनगर । दि.08 सप्टेंबर । श्रीरामपूर शहरामध्ये मोटारसायकल चोरणार्‍या टोळीला श्रीरामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दहा मोटारसायकल व एक टाटा कंपनीचा टेम्पो असा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश हिवाळे (राहणार पढेगाव, तालुका श्रीरामपूर) हा चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी श्रीरामपूर शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी हिवाळे याला ताब्यात घेतले. 

त्याच्याकडून दहा मोटारसायकलसह एक टाटा जीप टेम्पो जप्त करण्यात आले आहे. अटक आरोपीकडे चौकशी केली असता त्याने या गुन्ह्यात त्याच्यासह सहभागी असलेल्या सचिन शिंदे, जावेद सय्यद, रामनाथ गायकवाड या त्याच्या साथीदारांनी मदत केल्याची माहिती आरोपीने पोलिसांना सांगितली.

पोलिसांनी अन्य तिघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर पोलिसांनी ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post