'बिग बॉस ओटीटी'ची विजेती दिव्या अगरवाल

। मुंंबई  । दि.19 सप्टेंबर । ‘बिग बॉस ओटीटी’ला देखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यातील अनेक स्पर्धकांचे कौतुक झाले तर अनेकांवर टीका देखील करण्यात आली. मात्र या सगळ्यानंतर ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती दिव्या अग्रवाल ठरली आहे. 

तिला 25 लाख रुपयांचा इनाम देखील मिळाला आहे. बिग बॉस ओटीटीचे विजेतेपद पटकावल्यानंतर दिव्या खूप आनंदी आहे. या फिनालेमध्ये निशांत भट हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर शमिता शेट्टी ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. 

पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘बिग बॉस’चा हा सिझन पार पडला होता. करण जोहरने हा संपूर्ण सिझन होस्ट केला. शनिवारी झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी’ अंतिम फेरीमध्ये पाहुणे कलाकार म्हणून बलीवूडचे क्युट कपल रितेश आणि जिनेलियाने हजेरी लावली होती.

दिव्याने आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्हीच्या डेटिंग शो स्प्लिट्सविलापासून केली. दिव्याला या शोमधून ओळख मिळाली. यानंतर दिव्याने Ace of Space मध्ये देखील भाग घेतला. आणि या शो मध्ये सुद्धा दिव्या ने सर्वांना मागे टाकून विजेतेपद मिळवले. दिव्या एक अभिनेत्री, मॉडेल आणि कोरिओग्राफर देखील आहे. दिव्याने मिस नवी मुंबईचा किताबही पटकावला आहे.


 


Post a Comment

Previous Post Next Post