। अहमदनगर । दि.19 सप्टेंबर । बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला व आतील सामानाची उचकापाचक केली. बेडरूममधील कपाटातील तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण व पाच हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा 35 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
ही घटना कोठी रोडवरील हेमराज केटर्ससमोर घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी रोहिणी विजय पुंड (वय 45, राहणार हेमराज केटर्स समोर, कोठी रोड, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार देवराम ढगे करीत आहे.
Tags:
Ahmednagar
