सापळ्यात चक्क बिबट्याच अडकला आणि सर्वांचीच भंबेरी उडाली

। अहमदनगर । दि.19 सप्टेंबर ।  श्रीगोंदा तालुक्यात अनेक भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या घटना घडत होत्या बिबट्या दिसणाऱ्या भागात वनविभागाने अनेकदा त्याला पकडण्यासाठी पिंजरे देखील लावले पण बिबट्या वनविभागाच्या हाती लागत नव्हता

परंतु श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी गावातील डोमाळवाडी येथील एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात शिकारीसाठी काही लोकांनी लावलेल्या सापळ्यात काल रात्री एक बिबट्या अडकला आणि एकच खळबळ उडाली  आज सकाळी याबाबत श्रीगोंदा वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथक त्याठिकाणी पोहोचले

जुन्नर वरून रेस्क्यू पथक बोलावण्यात आले असून ते या बिबट्याला बेशुद्ध करून पकडून नेणार असल्याची माहिती वनविभागाकडून मिळाली आहे

परंतु शिकाऱ्यांनी किरकोळ शिकार पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यात चक्क बिबट्याच अडकला आणि सर्वांचीच भंबेरी उडाली या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात असणारा बिबट्याचा वावर स्पष्ट झाला आहे.

 


 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post