। अहमदनगर । दि.19 सप्टेंबर । येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे ईफका लेबोरेटरीज कंपनी मध्ये असिस्टंट मॅनेजर असलेले लकी पाराजी मगर यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.
न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर या महाविद्यालयाच्या रिसर्च सेंटर च्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी आयडेंटिफिकेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ इप्युरिटि प्रेसेंट इन अॅक्टिव फार्मासिटिकल इन्ग्रेडियंट अँड इट्स कॅरेक्टररेशन बाय ऍडव्हान्स अनलिटिकल टेक्निक हा शोध निबंध सादर केला. यास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस झावरे यांचे मार्गदर्शन लाभले.
ते गेली बारा वर्षापासून ईफका या औषधी कंपनीत कार्यरत आहेत. डॉक्टर लकी मगर यांना याकामी सदाशिव मोडवे, डॉक्टर साहेबराव रिंधे, डॉक्टर सुषमा ताकटे, डॉक्टर वैभव गोडसे, यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे सचिव जी डी खानदेशे यांनी अभिनंदन केले.
