। नवी दिल्ली । दि.20 सप्टेंबर । आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदी दरात घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीवर दबाब आहे. परंतु सध्या तो मावळताना दिसत आहे. सोने-चांदीच्या दरात घट झाल्याने नागरीक आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
जागतिक कमकुवत संकेत हे यामागचं प्रमुख कारण आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर सोने दरात जवळपास 0.13 टक्क्यांची घसरण झाली असून दर 45,928 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीच्या दरात 1 टक्का घसरण झाली असून दर 59,427 रुपये प्रति किलोग्रॅम असल्याचे दिसून येत आहे.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगानिस्तानातील परिस्थितीचा परिणामही सोने दरावर होवून सोने दरात वाढ होऊ शकते. वर्षाअखेरीस सोनं रेकॉर्ड स्तरावर पोहोचू शकतं असा अंदाज आहे. त्याशिवाय देशात देशात सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने सोन्याची मागणी वाढेल.
मॅक्स वर ऑक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे. सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.
Tags:
Maharashtra
