बेलवंडीतील शेतकर्‍याचे अपहरण; खडका फाट्यावर म्होरक्या जेरबंद

। अहमदनगर । दि.20 सप्टेंबर । श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील शेतकरी अपहरणाचे गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.

अक्षय सुभाष सोनवणे (वय 25, रा. वाडेगव्हाण, पारनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खडका फाट्यावरील टोलनाक्याजवळ मोठ्या शिताफीने या आरोपीस कैद करण्यात आले आहे.

मे 2021 मध्ये राजाराम चंदर राजाराम ढवळे (वय-44 वर्षे, धंदा- शेती, रा. राजापूर शिवार, ता. श्रीगोंदा) यांचे राजापूर शिवारातील घोडनदी पात्रालगत असलेल्या गट नं. 40 मधील शेत जमिनीमधून आरोपी संतोष राधू शिंदे व त्याचे साथीदारांनी अंदाजे 12,00,000/- रु. किं. ची माती बळजबरीने चोरुन नेली होती.

सदर घटनेबाबत ढवळे यांनी बेलवंडी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्याचा राग मनामध्ये धरुन 2सप्टेंबर 2021 रोजी आरोपी नामे अक्षय सोनवणे, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर याने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीचे ढवळगाव येथून अपहरण करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली होती.

त्याबाबत बेलवंडी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील मुख्य अक्षय सोनवणे हा फरार झाला होता. नमुद फरार आरोपीचा पोनि अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असताना पोनि कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि,

अक्षय सोनवणे हा एका पांढर्‍या रंगाच्या महिन्द्रा एक्सयुव्ही गाडी नं. एमएच-16-बीएम-7001 या गाडीमधून -अहमदनगर रोडने अहमदनगर शहराचे दिशेने येत आहे. खडका फाटा टोलनाका येथे सापळा लावून त्यास अटक करण्यात आली.

सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ भाऊसाहेब काळे, दत्तात्रय गव्हाणे, विजयकुमार वेठेकर, फकीर शेख, पोना सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, संदीप दरंदले, ज्ञानेेशर शिंदे, रवि सोनटक्के, पोकॉ जालिंदर माने, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post