ओळखपत्रावरून तो ग्रामसेवक असल्याची माहित समोर
। पाटोदा । दि.25 सप्टेंबर । सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून एका 50 वर्षीय इसमाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या व्यक्तीच्या ओळखपत्रावरून तो ग्रामसेवक असल्याची माहिती समोर आली आहे. सौताड्यात एकाच आठवड्यात ही दुसरी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काही पर्यटकांनी या व्यक्तीस उडी मारताना पहिल्याने त्यांनी त्यांनी व ग्रामस्थांनी ही माहिती पोलिसांना दिली. पाटोदा ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष पाटील, एपीआय धरणीधर कोळेकर , कर्मचारी अशोक तांबे, सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. धबधब्याजवळ बॅग सापडली.
यात ओळखपत्र सापडले यावरून या व्यक्तीचे नाव झुंबर मुरलीधर गवांदे आहे. ते श्रीगोंदे पंचायत समिती कार्यालय येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत अशी माहिती समोर आली. उंचीवरून उडी मारल्याने मृतदेह सापडण्यास अडचणी आल्या. या मृतदेहाचा शोध शनिवारी घेण्यात येणार आहे. पोलिसांनी मयताच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे.
यामध्ये एक ओळखपत्र सापडले. यावेळी पोलीस निरीक्षक पाटील यांनी भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू केली. सदर आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. अंधार पडला असल्याने उंचावरून दगडात पडलेल्या मृतदेहाला बाहेर काढण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सकाळची वाट पाहावी लागणार असून, मृतदेह वर आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. सौताड्यातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वनविभागाने संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी गावकरी करत आहे

