गुरुवारी मध्यरात्री तवेरा कार (एमएच 04 सीटी 1012) व्यंकटेश मोबाईल शॉपी फोडण्यादरम्यान मेनरोडला सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली. तीच कार पोलिसांना बेवारस आढळली. दरोडेखोरांची टोळी मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती, असे एकंदरीत पुढे येत आहे. मेनरोडला सोन्याच्या दागिन्यांची मोठी बाजारपेठ आहे.
सोन्याचे भाव देखील गगनाला भीडल्याने दरोडेखोरांचा दुकाने टार्गेट करण्याचा प्रयत्न असावा. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असताना त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. शहरातील मुख्य बाजारपेठ व मार्गांवर कॅमेरे बसवण्यासाठी पालिका व व्यापार्यांनी पुढाकार घेतला.
मात्र यंत्रणा अद्याप कार्यरत नाही. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी असोशिएशचे प्रकाश कलंत्री, सुनील दिवेकर, नगरसेवक किशोर टोकचे, जीवन पंचारिया, ज्ञानेश्वर कर्पे, दीपक भगत यांनी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख याच्याकडे निवेदनाद्वारे केली.
Tags:
Crime
