। अहमदनगर । दि.25 सप्टेंबर । दिल्लीच्या वेशीत सुरु असलेल्या विविध शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला रविवारी 10 महिने पूर्ण होत आहेत. मात्र दुराग्रही, संवेदशीलता नसलेले मोदी-शहा सरकार ढिम्म बसले आहे. केंद्र सरकारचा निषेध व त्यांच्या धोरणाला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटनांनी सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन किसान संघर्ष समितीने केले.
तीन काळे कृषी कायदे रद्द करा. कायदे शेतकरी, ग्राहक विरोधी असून अंबानी, अदानी या भांडवलदारांच्या कल्याणासाठी केले. कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करा. पेट्रोल, डिझेल, औषधे, खते आदी वस्तूंची महागाई कमी करा. वीज विधेयक मागे घ्या. बेकारी नष्ट करा आदी मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदची हाक दिली आहे. सोमवारी दुपारी 1 वाजाता प्रांत कार्यालयसमोर सभेचे आयोजन केले आहे.
यावेळी मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून जनतेने आंदोलनात सहभाग घ्यावा, असे आवाहन किसान संघर्ष समितीचे संयोजक प्रा. शिवाजी गायकवाड, शांताराम गोसावी, बाबुराव गायकवाड, अॅड. निशा शिवूरकर, अनिल गुंजाळ, ज्ञानदेव सहाणे, दशरथ हासे, अनिल कढणे, ज्ञानेश्वर राक्षे, सुनंदा राहाणे, ड. अनिल शिंदे आदींनी केले.

Tags:
Ahmednagar