। अहमदनगर । दि.25 सप्टेंबर । महाराष्ट्रासह देशात महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा भारतीय वाल्मिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध नोंदविण्यात आला. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक तालेवर गोहेर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नरेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष साहिल कुडिया, आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, दया गजभिये, आयटी सेल प्रमुख मंगेश मोकळ, विक्रम चव्हाण, सिध्दार्थ चव्हाण, रवी गोहेर, पप्पू वाघमारे, गौतम कांबळे, साहिल कुडिया, सुरज जंगारे, निखील सुर्यवंशी, अक्षय सुर्यवंशी,
नितीन सुर्यवंशी, राहुल विधावे, हे सहभागी झाले होते. देशातील बलात्कार प्रकरणाचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, महिला व युवतींना सुरक्षा प्रदान करण्यासाठी कायदे कठोर करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
