बेलापूरामध्ये तरसाचे दर्शनाने नागरीकात भितीचे वातावरण

। अहमदनगर । दि.25 ऑगस्ट । येथील बाजारतळ परिसरात तरस सहसा आपल्या परिसरात न आढळणार्‍या दुर्मीळ प्राण्याचे अचानक बेलापुरात दर्शन झाल्याने येथील नागरीक चांगलेच भयभीत झाले आहे. त्यामुळे परिसरामध्ये भितीचे वातावरण परसले आहे.

बेलापूर येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास तरस या प्राण्याचा संचार आढळून आला. दुर्मीळ अशा प्रजाती वर्गातील हा प्राणी मांसाहारी मानला जातो. मेलेल्या प्राणी, पक्षांचे मांस व हाडे खावून तो गुजरान करणे हे या प्राण्याचे वैशिष्टय मानले जाते.

तरस हा निशाचर असून अंगाच्या विशिष्ट ठेवणीमुळे शिकार करत नाही असे असले तरी रात्रीच्यावेळी शेळ्या, कोंबड्यांवर मात्र तो ताव मारतो. बिबट्याने शिकार करुन खावून उरलेल्या मांस व हाडांचे आवशेष खाण्यासाठी तो भटकत असावा असा अंदाज नागरीकांनी बांधला आहे.

बेलापूर येथील बाजारतळ परिसरात तरसाचे दर्शन झाल्याने गवात चांगलीच चर्चा रंगली होती. तरस अढळून आल्याबाबत मोबाईलवर फोंटोसह संदेश टाकून नागरीकांनी इतर ग्रामस्थांना व पंचक्रोशीतील नागरीकांना सावध सुचना केल्या आहेत.

मध्यंतरी बिबट्याने विविध भागात हैदोस घातला होता. त्या पाठोपाठ आता तरसाचे दर्शन झाल्याने नागरीकांमध्ये चांगलेच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरस हा प्राणी सहसह दिसत नसला तरी तो बिबट्याने केलेल्या शिकारीवर तसेच रात्री कोंबड्या बकर्‍यावर ताव मारतो असा अंदात वयोवृध्द मांडत आहेत.

त्यामुळे सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरीकांना सावध करण्याचा प्रयत्न येथील युवक वर्गाने केला असला तरी नागरीकांनी देखील सतर्कता बाळण्याची गरज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post