ओझर खुर्द शिवारात आढळला मृत बिबट्या

। अहमदनगर । दि.29 ऑगस्ट । संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द शिवारातील नेमबाई माळ परिसरातील शेतात मृत बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली असून या मृत बिबट्याला वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, ओझर खुर्द शिवारातील नेमबाई माळ परिसरात डाळींब पिकाला औषध फवारणी करण्यासाठी चाललेल्या मजुरांना येथील शेतकरी शंकर आनंदा शिंदे यांच्या गट नंबर 73 मध्येे एक बिबट्या निपचित पडलेला दिसला. त्यामुळे या मजुरांची भीतीने गाळण उडाली. 

परंतु बराच वेळ होऊनही त्याची हालचाल होत नसल्याने धाडस करत थोडे जवळ जाऊन पाहिले असता बिबट्या मृत असल्याचे लक्षात आले. शेतकरी शंकर शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, हा मृत बिबट्या अंदाजे दीड ते दोन वर्ष वयाचा मादी बिबट्या असून दोन बिबट्याच्या भांडणात या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर या मृत बिबट्यावर निंबाळे येथील नर्सरीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post